June 25, 2025
Entertainment

James Gunn चा ‘Superman’ ११ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये झेपावणार

  • May 15, 2025
  • 0

“Your choices, your actions, that’s what makes you who you are. #Superman – Only In Theaters and @Imax July 11” Warner Bros. Pictures कडून या उन्हाळ्यात जगभरात प्रदर्शित

James Gunn चा ‘Superman’ ११ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये झेपावणार

“Your choices, your actions, that’s what makes you who you are. #Superman – Only In Theaters and @Imax July 11”

Warner Bros. Pictures कडून या उन्हाळ्यात जगभरात प्रदर्शित होणारा “Superman” हा DC Studios चा पहिला फीचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दिग्दर्शक James Gunn आपल्या खास शैलीत, एक महाकाव्यात्मक कृती, विनोद आणि हृदयस्पर्शी गोष्टींनी परिपूर्ण अशा नव्या कल्पनेतील सुपरहिरोची कहाणी घेऊन येत आहे. या चित्रपटात एक करुणामय आणि मानवतेच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारा Superman प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

DC Studios चे प्रमुख Peter Safran आणि James Gunn हे चित्रपटाचे निर्माता असून, James Gunn याने स्वतःच्या स्क्रिप्टवर हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हे पात्र डीसी कॉमिक्सवर आधारित असून, Superman चे मूळ निर्माते जरी सिगल आणि जो शुस्टर आहेत.

Superman
Superman

या चित्रपटात David Corenswet (“Twisters,” “Hollywood”) Superman/Clark केंट या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. रेचेल ब्रॉसनहान (“The Marvelous Mrs. Maisel”) ही लोइस लेनच्या भूमिकेत असून निकोलस हॉल्ट (“X-Men,” “Juror #2”) लेक्स लूथरच्या रूपात दिसणार आहे. याशिवाय एडी गॅथेगी, अँथनी कॅरिगन, नेथन फिलियन, इसाबेला मर्सेड, स्कायलर गिसोंडो, सारा सॅम्पायो, मारिया गॅब्रिएला द फाऱ्या, वेंडेल पिअर्स, अ‍ॅलन ट्युडिक, प्रुइट टेलर व्हिन्स आणि नेव्हा होवेल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते निकोलस कोर्डा, शांटल नोंग व्हो आणि लार्स विंथर आहेत. कॅमेऱ्यामागे, गनचे अनेक सहकारी त्याच्यासोबत आहेत — सिनेमॅटोग्राफर हेन्री ब्राहम, प्रॉडक्शन डिझायनर बेथ मिकल, कॉस्च्युम डिझायनर जुडीअ‍ॅना माकोव्हस्की, संगीतकार जॉन मर्फी, सह-संगीतकार डेव्हिड फ्लेमिंग, आणि एडिटर्स विलियम होय (“The Batman”) आणि क्रेग अल्पर्ट (“Deadpool 2,” “Blue Beetle”).

या ट्रेलरमध्ये लोइस लेन Superman ची मुलाखत घेते आणि विचारते की, “तू खरंच गंभीर आहेस का?” Superman उत्तर देतो, “हो.” आणि मग तयार होतो तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला. युद्ध थांबवण्यासाठी सुपरमॅन एका देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करतो, यावर चर्चा होते. तो उत्तर देतो, “मी युद्ध थांबवलं. लोक मरणार होते.”

मग लोइस विचारते, “तू राष्ट्राध्यक्षाशी चर्चा केली होती का?” सुपरमॅन उत्तरतो, “नाही.” आणि स्पष्ट करतो की तो कुणाचं प्रतिनिधित्व करत नाही, फक्त चांगल्या गोष्टींसाठी कार्य करतो. त्याच्या कृती आणि निवडीच त्याला परिभाषित करतात, असं तो ठामपणे सांगतो — “Your choices, your actions. That’s what makes you who you are.”

या संवादांमध्ये सुपरमॅनची मानवी मूल्यांवरील श्रद्धा, त्याची बांधिलकी आणि जगाला एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी दिसते. एक संवाद अगदी लक्षवेधी ठरतो: “He’s not a man. He’s an it.” पण सुपरमॅनच्या कृती त्याच्या मानवीयतेचा पुरावा देतात.

चित्रपटात एक दृश्य आहे जिथे सुपरमॅनसोबत एक कुत्राही दिसतो, जे त्याच्या साधेपणाची आणि सहानुभूतीची झलक दाखवतं. त्याच्या कृती, विचार आणि संवाद हे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात की खरा हिरो कोण असतो.

DC Studios प्रस्तुत, Troll Court Entertainment/The Safran Company निर्मित, A James Gunn Film, “Superman” हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी IMAX® आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर ९ जुलैपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होईल. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सद्वारे याचे वितरण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *